तालुक्यात ५६६ उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रात बंद झाले असून, यात २६५ महिला उमेदवारांचा समावेश आहे. १५ ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडणुका पार पडल्या, तर एका गावात (घोडसरवाडी) उमेदवारी अर्ज एकच आल्याने येथील निवडणूक रद्द झाली. अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रुक येथे ग्रामपंचायत निवडणूक मतदानात वादावादी झाली. कळस बुद्रुक, नवलेवाडी, धुमाळवाडी, ढोकरी, उंचखडक बुद्रुक, आंबड, मेहेंदुरी, देवठाण, विरगाव या गावात मोठी चुरस दिसली अन् मतदान घडवून घेण्यासाठी प्रचंड रस्सीखेच दिवसभर होती. औरंगपूर व परखतपूर येथे एका जागेसाठी निवडणूक होती.
इंदोरी, रूंभोडी, टाकळी, तांभोळ, पिंपळगाव निपाणी, हिवरगाव, गणोरे, वाशेरे, कळस खुर्द, सुगाव खुर्द, कुंभेफळ, पिंपळगाव खांड, पांगरी, धामणगाव आवारी, धामणगाव पाट, कोतुळ, नाचणठाव, बोरी, मन्याळे, लिंगदेव, लहीत बुद्रुक, पिंपळदरी, ब्राह्मणवाडा, बदगी, बेलापूर येथे शांततेत मतदान झाले. जिल्हा परिषदेचे सदस्य कैलास वाकचौरे, जालिंदर वाकचौरे, रमेश देशमुख, भाजप जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण शेळके आपापल्या गावात तळ ठोकून होते.