९० हजार ३९२ मतदारांपैकी ७३ हजार ५०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ३८ हजार ८७४ पुरुष तर ३४ हजार ६३० महिलांनी मतदारांनी मतदान केले.
राहुरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींच्या ३६६ मतदारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.
१६८ केंद्रांपैकी आठ केंद्रातील ५२ उमेदवारांवर यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.
राहुरी तालुक्यात ४४ ग्रामपंचायतींमध्ये शांततेने मतदान पार पडले. वांबोरी, उंबरे ,वळण, राहुरी खुर्द, गुहा, संक्रापूर, सात्रळ इत्यादी गावांमध्ये अत्यंत अटीतटीची व चुरशीची निवडणूक झाली. लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे मतदानाच्या पेट्या आणण्यात आल्या आहेत. मतमोजणी येत्या १८ तारखेला राहुरी महाविद्यालय येथे होणार असल्याची माहिती तहसीलदार एफ.आर.शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. निवडणूक यंत्रणेने काळजीपूर्वक यंत्रणा हाताळली, तर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदानावेळी कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.