शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

८८ लाखांचे नुकसान

By admin | Published: August 27, 2014 11:05 PM

अहमदनगर: शहरासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे़ संगमनेर शहराला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे़ या पावसात सुमारे ८८ लाख रुपयांचे नुकसान झाले

अहमदनगर: शहरासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे़ संगमनेर शहराला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे़ या पावसात सुमारे ८८ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, मदतीसाठीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने बुधवारी विभागीय आयुक्तांना सादर केला आहे़ अडीच महिन्यांपासून पावसाने दडी मारली होती़ खरिपाची पिकेही वाया गेली़ जिल्ह्यात टंचाईची स्थिती निर्माण झाली असून, टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे़ अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी शहरासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली़ सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता़ संगमनेर शहरात सर्वाधिक १४६ मि़मी़ पाऊस झाला़ त्यामुळे संगमनेर शहरातील नाटकी पुनर्वसन वसाहत, अलकानगर, रेहमतनगर,नवीननगर रोड आदी परिसरातील सखल भागात पाणी साचल्याने घरांमध्ये पाणी घुसले़ या परिसरातील सुमारे ४०५ कुटुंबीय बेघर झाले़ त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले़ नागरिकांच्या घरातील अन्न धान्याचे नुकसान झाले आहे़ घरातील कपडे,इतर संसार उपयोगी वस्तू, विद्युत उपकरणे, गॅस शेगडी आदी वस्तू पाण्यात वाहून गेल्या असून, जिल्हा प्रशासनाकडून याविषयीचा पंचनामा केला असून, त्यामध्ये अतिवृष्टीमुळे या परिसरातील नागरिकांचे ८७ लाख ९० हजार ९०० रुपयांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे़ सदर प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने पुढील कार्यवाहीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे़ अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या आपत्तीग्रस्तांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत दिली जाते़ त्यानुसार जिल्हा प्रशासनाने नाशिक येथील विभागीय आयुक्तांना नुकसान भरपाईविषयीचा प्रस्ताव सादर केला असून, अतिवृष्टीतील मदतीबाबत मार्गदर्शन मागविले आहे़ विभागीय आयुक्तांकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर संगमनेर शहरातील आपत्तीग्रस्तांना मदत दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.काय आहे अतिवृष्टीअतिवृष्टीमुळे सलग आठ दिवस घरात पाणी राहिले असेल किंवा घराची पडझड झाली असेल तर ही मदत देण्यात येते़ परंतु संगमनेर शहरात तसे झाले नसून, दुसऱ्या दिवशी पाणी वाहून गेले आहे़ त्यामुळे संगमनेर शहरातील नागरिकांना मदत द्यायची किंवा नाही,याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले आहे़