मार्च महिन्यामध्ये निमगाव जाळी येथे जवळपास ३४ कोरोना रूग्ण आढळले होते. यामुळे १७ मार्च ते १९ मार्च या तीन दिवस अत्यावशक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आले होते. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून निमगाव जाळीमध्ये पुन्हा करोनाचा उद्रेक होऊन रूग्ण वाढत असल्यामुळे पुन्हा लाॅकडाऊन करण्यात आला आहे. दुसरा लॉकडाऊन हा २ एप्रिल ते १० एप्रिल असा ९ दिवसाचा असल्याची माहिती पोलीस पाटील दिलीप डेंगळे यांनी दिली.
नागरिक मुळातच कोरोनाच्या मृत्यूमुळे घाबरले असल्यामुळे ९ दिवसाचा कडकडील लाॅकडाऊन हा शंभर टक्के पाळला जात असल्याचे दिलीप डेंगळे यांनी सांगितले. तर नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करत नसल्यामुळेच कोरोना वाढत आहे. कोरोना वाढीवर अंकुश ठेवण्यासाठी नेहमीच हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा. दोन व्यक्तींमधील सामाजिक सुरक्षित अंतर ठेवूनच कोरोनावर मात करण्यासाठी मदत होऊ शकेल असे मत निमगाव जाळी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तय्यब तांबोळी यांनी व्यक्त केले. ४५ वर्षांपुढील सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेऊन सुरक्षा वाढवावी असे आवाहन तांबोळी यांनी व्यक्त केले.