जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौध्द वस्त्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी जिल्हास्तरीय विविध योजना सामाजिक न्याय व विशेष आर्थिक सहाय्य योजना राबविण्यात येते. यात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे (पूर्वीचे नाव दलित वस्ती सुधार योजना), तसेच अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीमध्ये पाणी पुरवठ्याची कामे, मलनि:स्सारण, वीज, गटार बांधणे, अंतर्गत रस्ते, पोहच रस्ते, समाज मंदिराचे बांधकाम या कामांचा समावेश आहे. यासाठी पंचवार्षिक आराखडा तयार केला जातो. तसेच प्रत्येक वर्षी त्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्ती विकासासाठी निधी वितरीत केला जातो. २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून १४ तालुक्यांना सुमारे ९३ कोटी २७ लाख ५६ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. योजनेचे हे प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत.
-------------
सर्वाधिक निधी नेवाशाला
९३ कोटी निधीमधून सर्वाधिक १० कोटी ७६ लाखांचा निधी नेवासा तालुक्याला देण्यात आला आहे. त्यानंतर संगमनेरला ९ कोटी ४४ लाख, शेवगावला ७ कोटी, ७३ लाख, नगर तालुक्याला ७ कोटी ६४ लाखांचा निधी देण्यात आला आहे.
--------------
तालुकानिहाय निधी असा
अकोले - ४ कोटी ५० लाख ८० हजार
संगमनेर - ९ कोटी ४४ लाख ८३ हजार
कोपरगाव - ६ कोटी २८ लाख ५० हजार
राहाता - ६ कोटी ६८ लाख ३१ हजार
श्रीरामपूर - ६ कोटी ६८ लाख ५०
राहुरीमध्ये - ६ कोटी ९६ लाख
नेवासा - १० कोटी ७६ लाख ५० हजार
शेवगाव - ७ कोटी ७३ लाख ५१ हजार
पाथर्डी - ५ कोटी २९ लाख १० हजार
जामखेड - ३ कोटी ३४ लाख
कर्जत- ६ कोटी २ लाख ६० हजार
श्रीगोंदा - ६ कोटी ४३ लाख ८३ हजार
पारनेर - ५ कोटी ४६ लाख ५६ हजार
नगर - ७ कोटी ६४ लाख ५२ हजार