अहमदनगर: मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूने भूमिका न घेणाऱ्या सदस्याला लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा ठराव शनिवारी अहमदनगर येथे मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर येथे मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होतेm यावेळी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीबाबत मराठा समाजाने काय भूमिका घ्यावी यावर चर्चा करण्यात आली. यावेळी मराठा आरक्षणाबाबत ज्या आमदार व खासदारांनी भूमिका घेतली नाही, अशा सदस्यांना लोकसभा व निवडणूक लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मराठा समाज मतदान करणार नाही. तसेच जो पक्ष मराठा आरक्षणासाठी पाठिंबा देणार नाही, अशा पक्षाचा यापुढे प्राचार करायचा नाही, अशी शपथ यावेळी घेण्यात आली. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या तसेच मराठा आरक्षणाबाबत सरकारने घेतलेल्या भूमिकेचा देखील निषेध करण्यात आला. याशिवाय आम्ही जरांगे पाटील यांच्या सोबत असून एसआयटीने आमच्या प्रत्येकाची चौकशी करावी, असे पत्र सरकारला पाठविण्याचेही यावेळी ठरले.