श्रीरामपूर : मंदिरातील मूर्तीपेक्षा मानवी देहाच्या हृदयात भगवंत निवास करतो. हृदयातील भक्तीभावात तो भरलेला असतो, असे प्रतिपादन भामाठाण येथील अडबंगनाथ संस्थानचे मठाधिपती अरुणनाथगिरी महाराज यांनी केले. तालुक्यातील रामपूरवाडी येथे आयोजित कीर्तन महोत्सवात ते बोलत होते. यावेळी राहुल महाराज चेचरे, आदित्य महाराज, प्रसाद महाराज तऱ्हाळ, लखन महाराज, भास्करराव धनवटे, आण्णासाहेब धनवटे, हिराबाई लबडे उपस्थित होते.
अरुणनाथगिरी म्हणाले, केवळ परमार्थ करून चालणार नाही तर त्याला आध्यात्मिक ज्ञानाची जोड असावी लागते. असे ज्ञान नसेल तर त्या भक्ती-प्रेमभावामध्ये काही अर्थ नाही. सर्व प्राणीमात्रांमध्ये भगवंत आहे. भक्तीशिवाय मुक्ती नाही. भावाशिवाय भक्ती नाही. मुक्तीशिवाय शक्ती नाही. कोरोनाचे भय अजून संपलेले नाही. त्यामुळे सरकारच्या सूचनांचे पालन करून मास्क वापरा करावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सोपान खापटे, भागवत दिवटे, गणपत कुंजीर, संजय धनवटे, राजेंद्र धनवटे, अमोल खामटे, भाऊसाहेब नरोडे, सतीश धनवटे, शंकर धनवटे आदी उपस्थित होते.
--------