शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
3
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
6
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
7
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
8
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
9
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
10
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
11
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
13
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
15
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
16
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
17
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
18
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
19
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 4:20 AM

अहमदनगर : अवघ्या सहा वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून पसार झालेल्या संशयित आरोपीला नगर तालुका पोलिसांनी बुधवारी करमाळा परिसरातून अटक ...

अहमदनगर : अवघ्या सहा वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून पसार झालेल्या संशयित आरोपीला नगर तालुका पोलिसांनी बुधवारी करमाळा परिसरातून अटक केली. भाऊसाहेब बाळू माळी (रा. चिचोंडी पाटील, ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

नगर तालुक्यातील एका गावात चार दिवसांपूर्वी आरोपीने सदर अल्पवयीन मुलीस निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला होता. आरोपी माळी हा करमाळा तालुक्यातील दिवेगव्हाण (जि. सोलापूर) परिसरात लपला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली होती. माहितीनुसार पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सानप, उपनिरीक्षक डी.आर. जारवाल, पोलीस नाईक अशोक मरकड कॉन्स्टेबल सोमनाथ घावटे, सचिन वनवे, बाळू कदम, रवी सोनटक्के, दीपक शिंदे यांचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली.