केडगाव : नगर तालुक्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष लक्ष आहे. या तालुक्यात जलसंधारणाची जास्तीत जास्ते कामे करून तालुक्याचा दुष्काळ हटविणार आहोत. भातोडी येथील तलावाचे हस्तांतरण करून त्याची दुरुस्ती करणार आहे. यामुळे या तलावावर अवलंबून असणाऱ्या गावांना फायदा होईल, अशी ग्वाही मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.
‘गाव तेथे शिवसेनेची शाखा अभियान’अंतर्गत नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील गणातील निंबोडी, सारोळाबद्दी, टाकळी काझी, मदडगाव, सांडवा, कोल्हेवाडी, मदडगाव, दशमीगव्हाण या गावांमध्ये शिवसेना शाखेच्या नूतनीकरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा प्रमुख प्रा. शाशिकांत गाडे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, संदीप गुंड, पंचायत समिती उपसभापती डॉ. दिलीप पवार, माजी सभापती प्रवीण कोकाटे, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र भगत, युवा सेना प्रमुख प्रवीण गोरे, शंकर ढगे, विलास शेडाळे, जिवाजी लगड, प्रकाश कुलट, बी. डी. कोतकर उपस्थित होते.
गडाख म्हणाले, शाखेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले जाणार आहेत. शिवसेना भक्कम करणार आहोत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयारी सुरू केली आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणुका जिंकायच्या व जिल्हा परिषद पंचायत समिती ताब्यात घेणार आहोत. एका महिन्यात प्रत्येक गावात शाखा उद्घाटन करून गावाला भेटी देणार असल्याचे गडाख यांनी सांगितले. यावेळी गडाख यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
अविनाश पवार, शहाजी आटोळे, अशोक ढगे, संतोष ढगे, गुलाब सय्यद, आकाश आठरे, प्रमोद काळे, नंदू आठरे, भरत शेडाळे, अक्षय सुंबे, संदीप खामकर, अशोक आवारे, प्रकाश बोरुडे, संजय ढगे, रमेश गव्हाणे, संतोष कुटे, सुरेश कराळे, संतोष काळे, राजेंद्र काळे, नामदेव काळे, अजय बोरुडे, अमोल खांदवे यांची यावेळी उपस्थिती होती.
----
कालवा अस्तरीकरणास निधी मिळावा..
कुकडी पाटबंधारे विभाग क्र.२ अंतर्गत येणाऱ्या भातोडी तलावातून कालव्याद्वारे सांडवा, मांडवा, उक्कडगाव, दशमीगव्हाण, मदडगाव यांना शेतीसाठी पाणी देण्यात येते. या कालव्याला सिमेंट काँक्रीटचे अस्तरीकरण नसल्यामुळे लगतच्या शेतामध्ये पाण्याचा पाझर होऊन शेतजमिनी उपळून नापीक होत आहेत. त्यासाठी कॅनॉलला सिमेंट काँक्रीटचे अस्तर आवश्यक आहे. अस्तरीकरणासाठी राज्य शासनाकडून निधी मिळावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी केली.
----
२५ नगर शिवसेना
टाकळी काझी येथे शिवसेना शाखेच्या फलकाचे अनावरण करताना मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व इतर.