अहमदनगर - नऊ वर्षीय चिमुरडीच्या अंगावर भिंत पडून जागेवर मयत झाल्याची घटना बुरडगाव ( ता. नगर )आझादनगर येथे काल रात्री साडेनऊ वाजता घडली. यात तिघे जण जखमी झालेले आहेत.
बुरडगाव (ता. नगर ) परिसरातील आझादनगर या भागात तुकाराम मोरे यांचे कुंटुब राहत आहे. त्या कुंटुबात असणाच्या तुकाराम मोरे यांचेकडे त्यांची नात मुलीची मुलगी परी अनिल शिंदे ( वय -९ ) मुळगाव भोकर ( ता. श्रीरामपूर ) आली होती. घराच्या बाहेर खेळत असताना शेजारील भिंत रात्री साडेआठच्याच्या वेळेत त्यांच्या अंगावर पडली. यात परीचा जागीच मुत्यू झाला. तर लक्ष्मी राजू चौघुले ( वय -९ ), सौरभ नवनाथ पवार ( वय -१३ ) अनिकेत मोरी (रा. बुरडगाव ) हे सर्व जखमी आहेत.