अहमदनगर : रस्त्यावर पादचाऱ्यास मोटारसायकलची धडक दिल्यानंतर ग्रामस्थांनी पकडून ठेवलेल्या दुचाकीस्वराकडे दोन गावठी कट्टे व चार जिवंत काडतूस आढळून आल आहेत. निघोज-गव्हाणवाडी (ता. पारनेर) येथील हमलावाडी येथे शुक्रवारी रात्री साठेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.हमालवाडी येथे रात्री प्रताप मंजाबा साळुंके (वय ५३ रा. गुणोरे ता. पारनेर) याने रतीराम बाबुराव ढेरंगे यांना मोटारसायकलची धडक दिली. यावेळी साळुंके हाही दुचाकीवरून खाली पडला. त्याला परिसरातील ग्रामस्थांनी पकडून ठेवले व पोलीसांना माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी येऊन साळुंके याची झडती घेतली तेव्हा त्याच्याकडे एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस मिळून आले. पोलीसांनी त्याची अधिक चौकशी केली असताना त्याने आणखी एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस अपघातस्थळी फेकून दिल्याचे सांगितले. पोलीसांनी साळुंके याच्याकडून दोन गावठी कट्टे व चार जिवंत काडतूस जप्त केले आहेत. दरम्यान अपघातात जखमी झालेले ढेरंगे यांचे उपचारादरम्यान निधन झाले. साळुंके याने दोन गावठी कट्टे आणि काडतूस कोठून आणले याची माहिती पोलीस घेत आहेत. सहाय्यक पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक गाढे, मातोंडकर, कॉस्टेबल पवार, भिंगारदिवे, आव्हाड, कवडे, दिवटे, भापसे, देवढे, गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अपघात झाला अन् कट्टा तस्कर सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 1:34 PM