- शिवाजी पवार
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : श्रीरामपूर संगमनेर रस्त्यावर खंडाळ्याजवळ कार व मोटारसायकलच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. श्रीरामपूर शहरातील गायकवाड वस्ती येथील अन्वर मोहम्मद शेख (वय २४) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. कार उलटल्याने त्यातील तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. नांदूर व खंडाळादरम्यान रस्त्यावर कार व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात मोटरसायकलचे अक्षरशः तुकडे झाले. कारमधील तिघा तरुणांवर उपचार सुरू आहेत.