शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

तुळजापूर येथे जाणा-या भाविकांच्या वाहनाला अपघात : चालक ठार, सात जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:24 PM

तुळजापूर येथे दर्शनासाठी जाणा-या आंबेगाव, जुन्नर (पुणे जिल्हा) येथील भाविकांच्या वाहनाला जामखेड येथील हिंदुस्थान टायर दुकानासमोर मंगळवारी पहाटे अपघात झाला.

जामखेड : तुळजापूर येथे दर्शनासाठी जाणा-या आंबेगाव, जुन्नर (पुणे जिल्हा) येथील भाविकांच्या वाहनाला जामखेड येथील हिंदुस्थान टायर दुकानासमोर मंगळवारी पहाटे अपघात झाला. पहाटे साडेचारच्या सुमारास वाहन पलटी झाल्याने चालक जागीच ठार तर वाहनातील इतर सात जण जखमी झाले आहेत.पुणे जिल्ह्यातील चास आणि धनगरवाडी (आंबेगाव, ता-जुन्नर) येथून तुळजापूर दर्शनासाठी क्रूजर (एम.एच.-१४, ईयु-६४५०) या वाहनातून जात असताना जामखेड शिवारातील हिंदुस्तान टायर समोर क्रुझर वाहनाच्या तीन पलटी होऊन चालक धर्मेंद्र कोंडाजी कसबे (वय ३५, नारायणगाव ,जि. पुणे) हा जागीच ठार झाला. मंगलबाई कचरू बारवे (वय ५१ चास, नारोडी, ता. आंबेगाव, जि. पुणे), गिताबाई खंडू कडणे (वय ५५, चास नारोडी ता. आंबेगाव जि. पुणे), मच्छिंद्र गेणुभाऊ कदम (वय ४५, चास, नारोडी ता. आंबेगाव जि. पुणे), शंकर दत्तात्रय कदम (वय २६ मुंबई, ओंकार मच्छिंद्र कदम (वय २० चास, आंबेगाव), हौसाबाई झांबड नवले (वय ५५, खेड, जि. पुणे), वैशाली मच्छिंद्र कदम चास (वय ३५, चास, आंबेगाव जि. पुणे) हे जखमी झाले आहेत. वाहन पलटी झाल्यानंतर मोठा आवाज झाल्याने आसपासचे लोक जमा झाले. त्यांनी १०८ वाहनाला फोन करून बोलवले जखमींना जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींना हातपाय व डोक्याला मार लागला आहे. त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे, सुनिल गंडाळ यांनी उपचार केले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड