नगर तालुक्यातील एका गावात ८ मार्च २०२० रोजी ही घटना घडली होती. पीडित वृद्ध महिला शेतात एकटी असताना आरोपीने गलुलीने तिच्या तोंडावर दगड मारून मारहाण करीत तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तत्कालीन उपनिरीक्षक धनराज जारवाल यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले. खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने आठ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेले साक्षी, पुरावे व सरकारी पक्षाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेपैकी पंधरा हजार रुपये फिर्यादीस देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या खटल्यात ॲड. दिवाणे यांना हेडकॉस्टेबल पोपट रोकडे यांनी सहकार्य केले.
वृद्ध महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला दहा वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 4:23 AM