शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

चोरी प्रकरणी आरोपीस सात वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 7:34 PM

शेतातील इलेक्ट्रीक मोटार चालू करून दुचाकीवरून जात असलेल्या फिर्यादीस आरोपी नारायण नामदेव वायकर याने रस्त्यात अडवून धारदार हत्याराने मारहाण करून खिशातील रोख रक्कम काढून घेतल्याप्रकरणी

नेवासा : शेतातील इलेक्ट्रीक मोटार चालू करून दुचाकीवरून जात असलेल्या फिर्यादीस आरोपी नारायण नामदेव वायकर याने रस्त्यात अडवून धारदार हत्याराने मारहाण करून खिशातील रोख रक्कम काढून घेतल्याप्रकरणी येथील जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एम. बेलकर यांनी आरोपी नारायण नामदेव वायकर यास दोषी धरून सात वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. १३ जुलै १५ रोजी फिर्यादी धरम धनसिंग परदेशी (रा. जळके बु. ता. नेवासा) हे त्यांची इलेक्ट्रीक मोटार चालू करून नगर ते औरंगाबाद जाणारे महामार्गावरून मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास त्यांच्या शेताकडे जात असताना आरोपी नारायण नामदेव वायकर (रा. सोनेवाडी ता. कोपरगाव), संतोष अर्जुन निरगुडे (रा. पायरा ता.सिन्नर जि. नाशिक) व संदिप नारायण शेळके, (रा. मिरगाव ता सिन्नर जि. नाशिक) हे त्यांचे मोटारसायकलवरून पाठीमागून ट्रीपलसीट येवून फिर्यादीस वैजापूर जाणारा रस्ता कोठे आहे? असे विचारून त्यास त्यांनी गाडी आडवी लावून फिर्यादीचा रस्ता आडवला. आरोपी नारायण नामदेव वायकर यांनी त्याच्या जवळील असलेल्या धारदार हत्याराने फिर्यादीस मारहाण करून त्याच्या खिशातील रोख रक्कम ८०० रुपये बळजबरीने काढून घेवून लाथाबुक्कयाने मारहाण केली. त्यावेळी रस्त्याच्या दुस-या बाजुने एक ट्रॅक्टर चारा घेवून जात होता, तेव्हा फिर्यादीचा ओरडण्याचा आवाज ऐकून ते मदतीला धावले व आरोपीच्या तावडीतून फिर्यादीची सुटका केली. आरोपी नारायण नामदेव वायकर यास जागेवर पकडले तर उर्वरीत आरोपी पळून गेले.या प्रकरणी नेवासा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासी अधिकारी स.पो.नि. विनय सरवदे यांनी गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यामध्ये सरकारपक्षाच्या वतीने एकून आठ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेला पुरावा व सरकारपक्षातर्फे केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी नारायण नामदेव वायकर यास दोषी धरून त्यास भा.द.वि. कलम ३९७ नुसार सात वर्ष सश्रम कारावास तसेच भा.द.वि. कलम ३४१ नुसार एक महिना कैद व ५०० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दहा दिवस कैद अशी शिक्षा सुनावली. तसेच उर्वरीत आरोपींची पुराव्या अभावी निर्दोश मुक्तता केली. या खटल्यात सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड.देवा काळे यांनी काम पाहिले. त्यांना पो. हे, का. रेवणनाथ मरकड व पो, कॉ. सुभाष हजारे, पो.मा.राठोड, पो. हे. कॉ. एम.वी. शिंदे यांचे सहाकर्य लाभले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा