अहमदनगर : कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खुनाच्या घटनेनंतर प्रत्यक्षात झालेला तपास व नंतर सादर केलेल्या कागदपत्र व जप्ती पंचनाम्यामध्ये तफावत असल्याचा दावा आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदेचे वकील योव्हान मकासरे यांनी केला़जितेंद्रचे सरकार नियुक्त वकील मकासरे हे दोन दिवसांपासून युक्तिवाद करत आहेत़ खटल्याचे कामकाज जलदगतीने पूर्ण होण्यासाठी रविवारीही सुनावणी घेण्यात आली़ मकासरे म्हणाले, कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार व तिचा खून होण्याच्या दोन दिवस आधी आरोपींनी तिची छेड काढली होती़, असा दावा सरकारी पक्षातर्फे केला गेला आहे़ छेड दोन दिवस आधी काढली होती, तर मग त्याबाबत तक्रार का दिली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला़मुख्याध्यापक व शिक्षकांनी सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार मदत केली़ हजेरीपत्रक एकाच शाईमध्ये लिहिलेले आहे़ मुलीच्या मैत्रिणींनी दिलेला जबाब व साक्ष यात तफावत आहे. आरोपी शिंदे हा पळून गेला, असे सांगितले जात आहे़ त्याच्या पायाला जखमा का नाहीत, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला़ आरोपीचे कपडे जप्त करण्याबाबत न्यायालयाच्या नियमाचे पालन झाले नाही. कागदपत्रांवर आवश्यक सह्या नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले़स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक फौजदार कृष्णा पुंजाजी वाघमारे (५८, रा़ भारत चौक, सिव्हिल हडको, नगर) यांनी शहरातील सावेडीचा जॉगिंग ट्रॅक येथे गुलमोहराच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली़ रविवारी सकाळी ७ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली़कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खूनप्रकरण, तसेच जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांडाचे दोषारोपपत्र तयार करण्याच्या प्रक्रियेत त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता़ वाघमारे यांचा कायदेशीर बाबींचा अभ्यास असल्याने सेवाकाळात त्यांनी बहुतांश काळ पोलीस निरीक्षकांचे वाचक म्हणून काम पाहिले होते़
कोपर्डी तपासात विसंगतीचा आरोपी पक्षाचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 3:47 AM