अकोले : तालुक्यातील टाहाकारी येथे आदिवासी ठाकर समाजातील अमृता भिमा पथवे (वय ३०) वर्षीय शेतमजूर तरुणावर अॅसिड हल्ला करुन त्यास जखमी केल्याची घटना २६ जानेवारी २०२० च्या रात्री घडली. गुरुवारी (१३ फेब्रुवारी) रात्री उशीरा टाहाकारी येथील दोघांविरुध्द अकोले पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. या हल्ल्यात जखमी झालेला तरुण अमृता पथवे (रा. रा.टाहाकारी, हल्ली मुक्काम चास, ता.सिन्नर, जि.नाशिक) हा नाशिक येथे उपचार घेत होता. अॅसिड हल्ल्यात या तरूणाच्या तोंडाला, छातीवर, मांड्यावर भाजल्याने झालेल्या जखमा थोड्या बºया झाल्या होत्या. यानंतर त्याने गुरुवारी रात्री पथवे त्याने दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पथवे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी बाळासाहेब रामनाथ एखंडे (रा.टाहाकारी )व एक अज्ञात आरोपी अशा दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी २६ जानेवारी रोजी झोपेत असताना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास आरोपी घरात आले. त्यांनी प्लास्टिक बादलीमधील अॅसिडसारखे औषध फिर्यादीच्या अंगावर फेकले. यात फिर्यादीच्या तोंड, छाती, मांड्यांवर जखमा झाल्या, असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जब्बीर सय्यद करीत आहेत.
अॅसिड हल्ल्यात शेजमजूर जखमी; अकोले तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 1:34 PM