मार्गासाठी लवकरच भूसंपादन होणार आहे. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून राहुरी तालुक्यातून ४० किलोमीटर मार्ग जाणार असून तालुक्यातील ३०० शेतकऱ्यांच्या बागायत जमिनी शेती व राहती घरे जाणार आहेत. २०१७-१८ मध्ये नाशिक जिल्ह्यातील पांगरी ते नगर तालुक्यातील वाळकीपर्यंत केंद्रीय सर्वेक्षण पथकाने उपग्रहाद्वारे सर्वेक्षण केले होते. २०१९ मध्ये अधिसूचना जाहीर करून जिल्ह्यात ४ सक्षम अधिकारी म्हणून राहुरी, नगर, राहाता आणि संगमनेर येथील उपविभागीय अधिकारी यांना अधिकार दिले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहुरी कृषी विद्यापीठात आले असता शेतकऱ्यांनी विरोध करत निवेदन दिले होते.
या मार्गात नगर, संगमनेर, राहाता, राहुरी तालुक्यातून १०० किलोमीटरचा मार्ग आहे. संगमनेर तालुक्यातील १८, राहाता तालुक्यातील ५, राहुरी तालुक्यातील २४ तर नगर तालुक्यातील ९ गावांतील जमिनीचे संपादन केले जाणार आहे. राहुरी तालुक्यातील सोनगाव, सात्रळ, कनगर, राहुरी, वांबोरी गावांतून हा राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे.
.......यामुळे होतोय विरोध
राहुरी तालुक्यातील जमीन यापूर्वी केके रेंज, मुळा धरण आणि डिझेल वाहिनी, रेल्वे लाइनसाठी जमिनी हस्तांतरित झालेल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
............
असे होणार संपादन
धानोरे- सोनगाव ते राहुरी (मुळानदी) २२ किलोमीटर, राहुरी खुर्द ते डोंगरगण १८ किलोमीटर असे ४० किलोमीटरसाठी भू-संपादन करण्यात येणार आहे. पहिल्या २२ किलोमीटरमध्ये संपूर्ण बागायत क्षेत्र उद्ध्वस्त होणार आहे. सोनगाव, धानोरे, कानडगाव, कणगर, मोमीन आखाडा, वराळे वस्ती, तनपुरे वस्ती, खिलारी वस्ती, उंडे वस्ती, येवले वस्ती, राहुरी खुर्द, कृषी विद्यापीठ, सडे, खंडाबे खुर्द, वांबोरीकडील भागातून हा मार्ग जाणार आहे.