शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नेवासा तालुक्यातील ११० स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 10:27 AM

तालुक्यातील १५१ पैकी ११० स्वस्त धान्य दुकानदारांवर दंडात्मक कारवाई झाल्याने दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.  ७० टक्के पेक्षा कमी लाभार्थ्यांना धान्य पुरवठा झाल्या कारणाने या कारवाईला स्वस्त धान्य दुकानदारांना सामोरे जावे लागत आहे.

नेवासा : तालुक्यातील १५१ पैकी ११० स्वस्त धान्य दुकानदारांवर दंडात्मक कारवाई झाल्याने दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.  ७० टक्के पेक्षा कमी लाभार्थ्यांना धान्य पुरवठा झाल्या कारणाने या कारवाईला स्वस्त धान्य दुकानदारांना सामोरे जावे लागत आहे. ओएस मशीनद्वारे लाभार्थ्यांना स्वस्त धान्य वितरीत केले जाते. या प्रणालीतील गोंधळामुळे नेवासा तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना स्वस्त धान्य वितरीत होऊ शकले नाही. ज्या दुकानदारांच्या लाभार्थ्यांपैकी ७० टक्के पेक्षा कमी लाभार्थ्यांना स्वस्त धान्य मिळाले नाही. त्या धान्य दुकानदारांची अनामत रक्कम जप्त करण्याचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी श्री संदीप निचीत यांनी दिला असल्याची माहिती तहसीलदार उमेश पाटील यांनी दिली. नोटिसांवर कारवाई म्हणून तीन टप्यामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे.        ६ ते २० टक्के धान्य वाटप झालेली तालुक्यात २ दुकाने आहेत. त्यांची १०० टक्के अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश दिले असून त्यांच्या दुकानावरील १०० टक्के ग्राहकांच्या कार्डाची तपासणी होणार आहे. दुस-या टप्यामध्ये २१ ते ५० टक्के धान्य वाटप झालेली ५३ दुकाने आहेत. त्यांची १०० टक्के अनामत रक्कम जप्त करण्यात येणार आहे तर ५१ ते ७० टक्के धान्य वाटप झालेली ५५ दुकानदारांची ५० टक्के अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती तहसीलदार उमेश पाटील यांनी दिली.     

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासाahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय