आॅनलाईन लोकमतअहमदनगर, दि़ ९- शहरातील नो पार्किंग झोनमध्ये लावलेल्या वाहनांवर वाहतूक शाखेने टेम्पो क्रेनच्या माध्यमातून कारवाई करण्याची मोहिम सुरू केली आहे. २२ दिवसांत ५४१ वाहनांवर कारवाई करत १ लाख २२ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला असल्याचे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरिक्षक अजित लकडे यांनी सांगितले.शहरात बहुतांशी ठिकाणी नो-पार्किंग झोन प्रस्तावित केलेले आहेत़ परंतु वाहन चालक त्याचे काटेकोर पालन न करता वाहने रस्त्यावर उभा करतात़ त्यामुळे वाहतुकस अडथळा होऊन कोंडी होते़ शहरात अनेक ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची गंभीर समस्या बनली आहे़ वाहतूक विभागाने अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी १३ मार्च पासून टेम्पो क्रेन सुरू केले आहे़ त्यामुळे रस्त्यावर मध्ये लावण्यात आलेल्या वाहनांवर थेट कारवाई सुरू झाली आहे़ आठ दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात अस्ताव्यस्त लावलेल्या शासकीय वाहनांवरही वाहतूक विभागाने कारवाई केली़ त्यामुळे तेथील वाहनचालकांना आता चांगलीच शिस्त लागली आहे़ दिली गेट परिसरात, निलक्रांती चौकात रस्त्यावर वाहने उभा केली जात असल्याने वाहतूककोंडीची मोठी समस्या बनली आहे़ येथील वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे़
नो पार्किंगमधील ५४१ वाहनांवर कारवाई; १ लाख २२ हजार रूपयांचा दंड वसूल
By admin | Published: April 09, 2017 2:03 PM