कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासनाने मार्चपासून कडक निर्बंध लागू केले. प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही लोक नियमांचे उल्लंघन करत असल्याने पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्यासह कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन व शहर वाहतूक शाखेकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. शहरात दररोज चौकाचौकात नाकाबंदी करून ही कारवाई केली जात आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, विनाकारण बाहेर फिरणे, मोटरसायकलवर डबलसीट जाणे, विनामास्क, मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन, दुकाने उघडी ठेवणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली.
.............................
अशी झाली कारवाई
संचारबंदीचे उल्लंघन- केस- १८७५- दंड- ७१६९००
आस्थापना चालू ठेवणे- केस- ४३० - दंड- ८७१५००
मोटर सायकलवर डबलसीट जाणे- केस-१७४९- दंड-३५००००
विनामास्क फिरणे- केस-२६४६- दंड- १०६६५००
कोटपा अंतर्गत कारवाई- केस-९०८- दंड- १९५६००
मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई- केस-२१५३७- दंड- ६०४९६९५
सोशल डिस्टन्सिंग न पाळणे- केस-३९११- दंड- ९०३१००
.........
दहा दिवसात ४८०० जणांची कोरोना चाचणी
शहरात विनाकारण फिरणाऱ्या ४ हजार ८०० जणांची पोलीस व आरोग्य पथकाने कोरोना चाचणी केली. १७ मे पासून या मोहिमेला सुरुवात झाली होती. कोरोना चाचणीसह नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १७० जणांची वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.