श्रीगोंदा : प्रभारी तहसिलदार चारुशीला पवार यांनी एका महिन्यात चार ठिकाणी अवैध पध्दतीने जमा केलेल्या चार वाळूचे साठे जप्त केले. याप्रकरणी ५ लाख ४६ हजाराचा महसूल जमा केला आहे. तर चार वाहनांवर दंडात्मक कारवाई करुन ६ लाख ६ हजार ७१ इतका दंड वसूल केला आहे.
पेडगाव येथे अवैध वाळू उपसा करणा-या १० व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. म्हसे येथील घोड नदीपात्रातून १ वाहन अवैध वाळू वाहतूक करताना पकडले आहे. ३५ ब्रास अवैध वाळू साठ्यांचा लिलाव करुन १ लाख ७५ हजार वसूल केले आहेत.
अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करताना आढळून आलेल्या यंत्रसामग्रीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असा इशारा चारुशीला पवार यांनी दिला आहे.