नदीपात्रात रात्रीच्या वेळी तसेच मशीनरीच्या मदतीने वाळू उपसा करता येत नाही. मात्र, रात्री अडीच वाजता जेसीबी व पोकलेनने उपसा सुरू होता, अशी माहिती पोलीस निरीक्षक साळवे यांनी ‘लोकमत’ला दिली. लिलावधारकाकडे काम करणारे पाच लोक ताब्यात घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन झाल्याने जिल्हाधिकारी मातुलठाण येथील लिलाव रद्द करणार का? याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, दुसरीकडे जिल्हा पोलीस प्रमुखांच्या या कारवाईचे नागरिकांतून स्वागत होत आहे.
-...
लिलावात छुपा सहभाग
गोदावरी नदीपात्रातील वाळूचे लिलाव नाशिक जिल्ह्यातील काही मंडळी पदरात पाडून घेतात. मात्र, त्यांच्या आडून मोठे मासे या धंद्यात उतरले आहेत. त्यांना राजकीय वरदहस्त आहे. पूर्वी गाव पातळीवरील कार्यकर्ते वाळू उपशामध्ये उतरत होते. आता मात्र त्यांना केवळ टक्केवारीवर समाधान मानावे लागत आहे.
...