जामखेड : वाकी परीसरातील खैरी प्रकल्पातून अवैध वाळू उपसा करणा-या पंधरा वाळूतस्करांवर कारवाई करण्यात आली. वाळूने भरलेले आठ ट्रक्टर जप्त केले असून ४३ लाख ७० हजार किंमतीचा ऐवज ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी अकरा आरोपी ताब्यात घेतले असून चार फरार झाले आहेत. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश फडतरे, हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब मुळीक, संदीप घोडके, विशाल दळवी, संदीप पवार, ज्ञानेश्वर शिंदे, सचिन अढवळ, राहूल साळुंके, विनोद मासाळकर, संभाजी कोतकर, बबन बेरड यांच्या पथकाने आज दुपारी साडेबारा वाजता वाकी परिसरातील खैरी प्रकल्पाला चारही बाजूने वेढा दिला असता आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी एक तासभर पोलीसांना आरोपी पकडण्यासाठी साठी वेळ गेला. तुकाराम गोपाळघरे (नागोबाची वाडी), गणेश सतिष जगताप, नितीन जगताप, दत्ता शामराव डोके (खर्डा), सुरज भागवत भुते, सोमेश्वर सोरटे, महेश घोडके, रावसाहेब सुरवसे, विजय जगन्नाथ सावंत, नंदकुमार जगन्नाथ सावंत, भिमराव प्रल्हाद गोपाळघरे यांना अटक करण्यात आली. भानुदास प्रल्हाद गोपाळघरे, राम विठ्ठल भोसले, नामदेव बाबासाहेब जोरे, मदन पांडुरंग गोलेकर हे पळून गेले. याबाबत पोलीस नाईक स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे संदीप चव्हाण यांनी फिर्र्याद दिली.
खैरी प्रकल्पातून वाळू उपसा करण्यांवर कारवाई : ४३ लाखाचा मुद्देमाल जप्त, ११ अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 7:08 PM