अहमदनगर: श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव व निमगाव खलू येथील भीमा नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळूतस्करीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून २७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे़पोलीस पथकाला पाहताच अनेक वाळूतस्कर वाहने सोडून पळून गेले यावेळी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली़ पेडगाव येथून निहाल इस्माईल शेख (वय २९) या वाळूतस्कराला अटक करण्यात आली़ यावेळी सचिन दत्तात्रय झिटे, विठ्ठल अण्णा बाबर, मन्सूर मेहबूब पिरजादे (सर्व रा़ पेडगाव) हे पळून गेले़ या कारवाईत चार ट्रॅक्टर, ट्रॉली व वाळू असा २१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ यानंतर निमगाव खलू येथे कारवाई करून पथकाने वाहनांसह ५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला़ पोलिसांना पाहताच नदीपात्रातून वाळूतस्कर पळून गेले़ याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
श्रीगोंदा तालुक्यातील वाळूतस्करांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 1:17 PM