श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील दुय्यम कारागृहातील कोठडी क्रमांक तीनमध्ये शुक्रवारी मध्यरात्री दोन आरोपींमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला. या घटनेमागील कारण समजू शकले नाही.जखमीमध्ये मंगेश भरत चव्हाण या आरोपीचा समावेश आहे. राजू सयत्या पवार (रा. पेडगाव ता. श्रीगोंदा) व मंगेश भरत चव्हाण (रा. जलालपूर ता. कर्जत) हे दरोडेखोर सध्या श्रीगोंदा येथील दुय्यम कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. शुक्रवारी मध्यरात्री दोघांनी जेवणाच्या ताटांनी डोक्यात मारण्यास सुरुवात केली. पवार याने चव्हाण याला खाली पाडून त्याच्या डोक्यात ताटाने मारहाण करण्यास सुरुवात केली. कोठडीतील हस्तक्षेप करुन हाणामारी सोडविली. जखमी मंगेश चव्हाणला श्रीगोंदा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही हाणामारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.श्रीगोंदा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल दहीफळे करीत आहेत. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी कोठडीसमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. परंतु कोठडीत प्रमाणापेक्षा जादा आरोपी असल्याने वादावादीच्या प्रकारात वाढ झाली आहे.
कारागृहात दोन आरोपींमध्ये हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 5:07 PM