अहमदनगर : कोरोनाची तीव्रता असताना गतवर्षी एकाच दिवसात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही काही दिवस एक हजारांच्या आसपास राहिली. गेल्या आठ दिवसांपासून मात्र रोज दीड हजारांच्यावर रुग्ण बाधित होत आहेत. त्यामुळे सोमवारी सक्रिय रुग्णांच्या संख्येने दहा हजारांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला असल्याचे दिसते आहे. सोमवारी तब्बल १,८४२ जणांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्ह्यात सोमवारी १,१०० रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९२ हजार १४८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.०४ टक्के इतके झाले आहे. उपचार घेणाऱ्या (सक्रिय) रुग्णांची संख्या १० हजार १०६ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ६७२, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५८० आणि अँटीजेन चाचणीत ५९० रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर (६६६),
श्रीरामपूर (१५०), राहाता (१४१), नगर ग्रामीण (१२९), संगमनेर (११३), कोपरगाव (१०९), शेवगाव (९४), अकोले (६९), राहुरी (६४),पारनेर(६१), पाथर्डी(५९),नेवासा (५४), कर्जत (३३), भिंगार (२५), श्रीगोंदा (२५), जामखेड (२३), इतर जिल्हा (२३), मिलिटरी हॉस्पिटल (४), इतर राज्य (०), एकूण (१,८४२).
-------
बरे झालेली रुग्ण संख्या : ९२,१४८
उपचार सुरू असलेले रूग्ण : १०,१०६
मृत्यू : १,२४२
एकूण रूग्ण संख्या :१,०३,४९६
-----------
चार जणांचा मृत्यू
नगर जिल्ह्यात एकाच दिवसात चार जणांचा मृत्यू झाला. गत दोन दिवसात एकही मृत्यू झाला नाही. गंभीर रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर जाणे टाळावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे. गंभीर रुग्णांची संख्या वाढत असली तरी सर्व शासकीय, खासगी रुग्णालयांना अनुभव आणि यंत्रणा सुसज्ज असल्याने मृत्यूचा दर कमी झाला आहे, असे आरोग्य यंत्रणेने सांगितले.