मंडळाच्या डॉक्टर आणि आपण या उपक्रमांतर्गत येथील सुप्रसिद्ध फिजिशियन डॉ. दिलीप पडघन यांचे कोरोना आणि लसीकरण या विषयावर ऑनलाइन व्याख्यान आयोजित केले होते. महिलांनी गृहिणी आणि कुटुंबप्रमुख या नात्याने कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर प्रतिबंध कसा करावा, तसेच मुले, तरुण, प्रौढ आणि वृद्ध यांच्या जीवनशैलीत, आहारविहारात योग्य तो बदल करावा, असे सांगितले. प्रसिद्ध योगशिक्षिका नीलम कृपाल देशपांडे यांनी मार्गदर्शन केलेल्या या शिबिराचा मंडळाच्या साठ भगिनींनी लाभ घेतला.
..............................
कोविड सेंटरला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आज प्रदान
श्रीरामपूर : माजी खा. स्व. गाेविंदराव आदिक यांच्या कन्या अंजलीताई पुनातर यांच्याकडून श्रीरामपूर पालिकेच्या कोविड सेंटरला ४ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आज प्रदान करण्यात आले. नगराध्यक्षा अनुराधा गोविंदराव आदिक यांच्या भगिनी असणाऱ्या अंजलीताई पुनातर आणि स्वर्गीय गोविंदराव आदिक यांचे जावई रोटरी क्लब ऑफ मुंबई सोबोचे अध्यक्ष राजीव पुनातर तसेच रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वरळीचे अध्यक्ष निमेश संघ्राजिका यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर नगरपालिकेच्या कोविड सेंटरला १० लिटरचे चार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान करण्यात आले. यावेळी खा. सदाशिव लोखंडे, नगराध्यक्ष अनुराधा आदिक, मुख्याधिकारी गणेश शिंदे, डॉ. वसंत जमदाडे, डॉ. संकेत मुदंडा, डॉ. सचिन पऱ्हे, नगरसेवक राजेंद्र पवार, राईस जहागीरदार, शिवसेनेचे अशोक थोरे, अलतमश पटेल, दीपक मारशिया उपस्थित होते.
......................
योग शिबिरात ५०० शिक्षकांचा सहभाग
श्रीरामपूर : दक्षिण आफ्रिकेतील मोरोक्को देशातून आयुष मिनिस्ट्री आर्ट ऑफ लिव्हिंगच्या योग टीचर रचना फासाटे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक, अधिकारी यांच्या आरोग्यासाठी मोफत आंतरराष्ट्रीय ऑनलाइन योग प्राणायाम शिबिर ११ ते १६ मेपर्यंत आयोजित केले होते. शिबिरात सुमारे ५०० शिक्षक, शिक्षिका व त्यांचे कुटुंब सहभागी झाले होते. शिबिरात पद्मश्री पोपटराव पवार, दिनकर टेमकर, पद्मश्री राहीबाई पोपेरे, शिक्षणाधिकारी गुलाब सय्यद, डी. डी. सूर्यवंशी, अभयकुमार वाव्हळ, शिवाजी कराड, रामनाथ कराड, विक्रम अडसूळ, शोभाताई पवार, शैलजा राऊळ यांनी कृतिशील सहभाग घेतला. शिबिराचे आयोजन उपक्रशील शिक्षक तुकाराम अडसूळ, आदर्श उपक्रमशील शिक्षिका शुभांगी शेलार यांनी केले.