शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

आदिवासी शिक्षणाचे ‘आदर्श विद्यापीठ’

By admin | Published: September 04, 2014 11:09 PM

रियाज सय्यद, संगमनेर शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करणारी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांचे ‘आदर्श विद्यापीठ’ ठरली आहे.

रियाज सय्यद, संगमनेरपठार भागात अकलापूरच्या अतिदुर्गम साडेसात एकर खडकाळ माळरानावर नंदनवन फुलवून शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करणारी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांचे ‘आदर्श विद्यापीठ’ ठरली आहे. ‘विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास’ हे ध्येय घेवून १० आॅक्टोबर १९८९ रोजी आश्रमशाळेची स्थापना झाली. आश्रमशाळेने शैक्षणिक गुणवत्तेसह विविध उपक्रमांद्वारे ‘उपक्रमशील शाळा’ म्हणून प्रतिमा तयार केली. प्रारंभी १ ते ७ वीपर्यंत वर्ग होते. आज १२ वी कला व विज्ञान शाखांचे वर्ग भरतात. सुमारे ६०० आदिवासी विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवतात. साडेसात एकर खडकाळ भागावर वृक्षराजींचे संगोपन करून परिसर हिरवागार केला आहे. ‘रद्दीतून ग्रंथालय’ या उपक्रमाद्वारे वर्तमानपत्रातील अभ्यासपूरक माहिती संकलित करून पुस्तिका तयार केली. ‘कचरामुक्त शाळा’ उपक्रमातून शाळा परिसर स्वच्छतेचा पायंडा पाडला आहे. ‘गांडूळखत’ प्रकल्पाद्वारे शाळेतील ओला कचरा, सुका कचरा वेगळा करून गांडूळखताची निर्मिती केली जाते. शेवगा, सुबाभूळ, अशोका, करंज, फुलझाडे, औषधी वनस्पती आदी प्रकारच्या झाडांची तयार केलेली ‘ट्री बँक’(रोपवाटिका) अतिशय सुंदर आहे. रोज पहाटे ५ वाजता स्वत: मुख्याध्यापक जी. डी. भांड विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कारासह योगा व प्राणायाम करून घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाला चालना मिळते. शाळेच्या क्रीडा विभागाचा नावलौकिक असून कल्पना केदार, सुनंदा भगत हिने धावण्यात राज्यस्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना येथे मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ‘भरारी’ या वार्षिक नियतकालिकातून शाळेचा लेखा-जोखा मांडला जातो. डिजीटल जमान्यात ‘वेबसाईट’ सुरू करणारी ही एकमेव शाळा आहे. दहावी व बारावीचे निकाल सतत ९० टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. सन २०१२-१३ मध्ये सचिन दळवी हा (१२वी कला) विद्यार्थी ८० टक्के गुण मिळवून आदिवासी विभागात पहिला आला. नावीन्यपूर्ण उपक्रम व भौतिक सुविधांमुळे शाळेला महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाचा ‘आदर्श आश्रमशाळा’ पुरस्कार मिळाला आहे. किशोरवयीन मुलींची आरोग्य व रक्तगट तपासणी, स्वसंरक्षणाचे धडे, मार्गदर्शनपर व्याख्याने, लेक वाचवा पथनाट्य, रांगोळी स्पर्धा, सुसज्ज व्यायामशाळा, पक्ष्यांसाठी चारा व पाण्याची सोय, विद्यार्थी नियतकालिके, वृक्षारोपण, वृक्षदिंडी, पर्यावरण संदेश नाटिका, क्षेत्रभेटी, वनभोजन, ‘पाणी आडवा-पाणी जिरवा’अंतर्गत पाझर तलाव निर्मिती ही शाळेची वैशिष्ट्ये आहेत.