अहमदनगर : जिल्ह्यात शनिवारी ११७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर ९० रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६९ हजार ४७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२३ टक्के इतके झाले आहे. सध्या ८९३ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५२, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५१ आणि अँटिजेन चाचणीत १४ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये नगर शहर (२५), अकोले (१), जामखेड (२), कर्जत (१), कोपरगाव (६), नगर ग्रामीण (१५), नेवासा (५), पारनेर (३), पाथर्डी (१४), राहता (१०), संगमनेर (१२), शेवगाव (३), श्रीगोंदा (१), पारनेर (४), श्रीरामपूर (७), कॅन्टोन्मेंट (३), इतर जिल्हा (५) अशा रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७१ हजार ४५५ बाधित आढळले असून, ६९ हजार ४७५ बरे झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १०८७ जणांचा मृत्यू झाला आहे.