जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ३२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४९ आणि अँटिजन चाचणीत ४४ रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा १५, जामखेड १, कर्जत २, नगर ग्रामीण ६, पाथर्डी १, राहाता ७, अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा ७, अकोले १, कोपरगाव ६, नगर ग्रामीण ५, नेवासा ३, पारनेर १, पाथर्डी १, राहाता ४, राहुरी ४, संगमनेर ६, श्रीरामपूर २, कॅन्टोन्मेंट २, इतर जिल्हा ७, अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटिजन चाचणीत शुक्रवारी ४४ जण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा ३०, कोपरगाव २, नगर ग्रामीण १, नेवासा २, राहाता १, संगमनेर ३, शेवगाव ४, श्रीगोंदा १, अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा ४०, अकोले ५, कर्जत ३, कोपरगाव २, नगर ग्रामीण ३, नेवासा २, पाथर्डी ९, राहाता १०, राहुरी १, संगमनेर २२, शेवगाव १५, श्रीगोंदा १४, श्रीरामपूर १, कॅन्टोन्मेंट १, मिलिटरी हॉस्पिटल ३, इतर जिल्हा १, अशा रुग्णांचा समावेश आहे.
१२५ नव्या बाधितांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 4:17 AM