राहुरी तालुक्यातील वळण येथील गावातील काही भागांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत होता. तसेच पूर्ण दाबाने पाणीपुरवठा न होण्यामुळे ग्रामपंचायतीकडे लोकांनी स्वच्छ पाणी व नियमित पाणी मिळावे अशी मागणी केली होती. संबंधित ग्रामपंचायतीकडून दखल न घेतल्यामुळे महिला आणि काही ग्रामस्थ आक्रमक होत आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कानडे फाट्यावरील संतप्त महिला त्याचबरोबर माजी उपसरपंच राजू मकासरे, सामाजिक कार्यकर्ते धनंजय आढाव, कारभारी खुळे, विजय आढाव आदींनी ग्रामपंचायतमध्ये दाखल होत निवेदन दिले.
त्यानंतर सरपंच सुरेश मकासरे, उपसरपंच एकनाथ खुळे, अशोक कुलट, ज्ञानेश्वर खुळे, रवींद्र गोसावी, ग्रामसेवक संतोष राठोड यांनी तत्काळ संबंधित ठिकाणी धाव घेत दूषित पाणीपुरवठा कोठून होतो, याची पाहणी केली. चौदा गाव पाणी योजनेची पाईपलाईन फुटल्यामुळे कदाचित थोडेफार गढूळ पाणी आले असेल पण आता यापुढे असे होणार नाही, अशी ग्वाही ग्रामसेवक संतोष राठोड यांनी दिली.
..........
कानडे फाटा व गावात इतर काही ठिकाणी अनेक दिवसांपासून नागरिकांच्या पाणीपट्ट्या थकलेल्या आहेत. सरपंचांना सहीचे अधिकार मिळाले नाही. त्यामुळे आर्थिक बाबतीत काही प्रमाणात अडचण असल्याने काम करताना तारेवरची कसरत करावी लागते. नागरिकांनी आपल्या हक्काबरोबर कर्तव्य म्हणून आपल्याकडील पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे.
-संतोष राठोड, ग्रामसेवक
...............
या ठिकाणी नवीन पाईपलाईन करायचीच होती. त्याच दृष्टीने आठ दिवसांपूर्वीच पाईप ही आणले होते. परंतु विरोधक काही गोष्टींना खतपाणी घालून स्ट॔ंट करत आहेत. आम्हाला देखील लोकांची काळजी आहे. विकास कामात राजकारण न करता सहकार्य करावे.
-एकनाथ खुळे, उपसरपंच
( कालच्या बातमीची इमेज वापरावी)