आश्वी : संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर येथील मानमोडे बाबा मंदिर परिसरातील भाऊसाहेब बर्डे, शिवनाथ सांगळे, सुधाकर सांगळे व हरिभाऊ आंधळे यांच्या बंगल्यावर गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी डल्ला मारत सुमारे १ लाख ९१ हजार रुपये किमंतीचा ऐवज चोरुन नेला. सुमारे 47 वर्षांनी प्रतापपूर गावात चोरी झाल्याने परिसरात भितीचे वातावरण आहे.भाऊसाहेब बर्डे यांनी आश्वी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गुरुवारी रात्री बर्डे कुटुंब हॉलमध्ये झोपलो होते. शुक्रवार सकाळी उठले असता घराच्या किचनचा दरवाजा त्यांना उघडा दिसला. त्यावेळी 75 हजार रुपये किमंतीचे तीन तोळे सोन्याचे दागिने व 13 हजार पाचशे रुपये रोख चोरट्यानी चोरुन नेल्याचे आढळले. शेजारी राहणारे शिवनाथ सांगळे यांच्या ही बंगल्याचा कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला. पँन्टच्या खिशातून 2 हजार रुपये, सुधाकर सांगळे यांच्याबंगल्यातून 24 हजार रोख, सोन्या व चांदीचे 76 हजार पाचशे रुपये किमंतीचे दागिने घेऊन चोरट्यानी पोबारा केला. तर हरिभाऊ आंधळे याच्या कंपाऊंडच्या गेटचे कुंलुप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. चोरट्यांनी एकूण 1 लाख 91 हजाराचा मुद्देमाल चोरुन नेला.1972 साली याच परीसरात ईलग वस्तीवरील भगवानराव ईलग यांच्या वस्तीवर चोरट्यांनी दरोडा टाकला होता. यानंतर सुमारे 47 वर्षांनी प्रतापपूर गावात चोरी झाली.
47 वर्षानंतर गावात झाली चोरी : दोन लाखाचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 7:07 PM