देवळाली प्रवरा, गुहा, गणेगाव या तीन गावांच्या रस्त्याचा प्रश्न येथील तीन कुटुंबांच्या वादात अडकल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वहिवाटीचा रस्ता करून द्या, अशी मागणी राहुरीचे तहसीलदार एफ. आर. शेख यांच्याकडे केली होती. महसूल प्रशासन व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये तसेच भूमी अभिलेख अधिकार यांच्या उपस्थितीमध्ये या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. शुक्रवार (दि. २७) गणेगाव गुहा व देवळाली प्रवरा येथील रस्त्याने ये-जा करणारे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झाले. महसूल खात्याचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले. मात्र, ऐनवेळी भूमी अभिलेखचे अधिकारी यांनी येण्यास नकार दिला. त्यामुळे तीनही गावांतील ग्रामस्थांनी आक्रमक होऊन नगर - मनमाड मार्गावर रास्ता रोको करून प्रशासनाचा निषेध केला. सुमारे एक तास हा रास्ता रोको सुरू राहिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक नीलेश वाघ व पोलीस उपनिरीक्षक धीरज बोकील हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.
तहसीलदार शेख यांच्यासह गावच्या नागरिकांनी केली यावर तहसीलदार शेख यांनी तिन्ही कुटुंबांशी चर्चा करून सदर रस्ता अखेर वहिवाटीस सुरू केला.
आंदोलनात भाजपाचे तालुका अध्यक्ष अमोल भनगडे, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात, कारखान्याचे व्हाईस चेअरमन दत्तात्रय ढुस, कारखान्याचे संचालक केशवराव कोळसे, देवळालीचे नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी, मनसे तालुकाध्यक्ष अध्यक्ष अनिल डोळस, किरण कोळसे, शरद वाबळे, धनंजय कोबरणे, मेजर राजेंद्र कडू, संपत कोबरणे, विठ्ठल डोळस, बबन कोळसे, धनंजय कोळसे, विकास कोबरणे, मच्छिंद्र कोळसे, तुषार दिवे सहभागी झाले होते.
....................
रस्ता लोकसहभागातून दुरुस्त
आंदोलनानंतर लगेच हा रस्ता लोकसहभागातून तातडीने दुरुस्त करून तीनही गावच्या नागरिकांना वहिवाटी साठी खुला करून देण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अनेक वर्षे खितपत पडलेला हा प्रश्न अखेर मार्गी लागला असल्याचे अनेकांनी यावेळी बोलून दाखवले.
........ २७ रस्ता ....