शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

प्रशासनाच्या तपासणीनंतरही जिल्ह्यात टँकर ‘लॉगबुक’ विना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:06 PM

शासकीय टँकरला गळती असता कामा नये, तसेच टँकर चालकांनी सतत ‘लॉगबुक’ सोबत ठेवावे असा शासनाचा आदेश असताना जिल्ह्यात आजही विनालॉगबुकचे टँकर आढळत आहेत.

शेखर पानसरे/गणेश आहेरसंगमनेर/लोणी : शासकीय टँकरला गळती असता कामा नये, तसेच टँकर चालकांनी सतत ‘लॉगबुक’ सोबत ठेवावे असा शासनाचा आदेश असताना जिल्ह्यात आजही विनालॉगबुकचे टँकर आढळत आहेत. संगमनेर तालुक्यातील सादतपूर जवळ ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंगमध्ये हे चित्र आढळून आले. त्यामुळे जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद या दोघांचाही हलगर्जीपणा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.दुष्काळ आणि लांबलेला पाऊस अशा परिस्थितीत दुष्काळी गावांमधील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी लांबवर पायपीट करावी लागते आहे. संगमनेर तालुक्यातील सादतपूर हे गाव संगमनेर शहरापासून साधारण २१ किलोमीटर तर राहाता तालुक्यातील लोणीपासून आठ किलोमीटर अंतरावर आहे. या गावाची लोकसंख्या शासकीय आकडेवारीनुसार १४०० ते १५०० इतकी असून दुष्काळात शासकीय योजनेतून टॅँकरद्वारे पिण्याचा पाणी पुरवठा होतो.सादतपूर गावठाण, काळेवस्ती तसेच बोरसे व गुंजाळ मळ्यांमध्ये एम.एच.-१७, बी.डी. ६३९८ या क्रमाकांच्या टॅँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. दिवसाला दोन ते तीन खेपा होतात. संगमनेरातून या टॅँकरमध्ये पाणी भरून टॅँकर चालक हा टॅँकर घेऊन बुधवारी सादतपूरकडे निघाला होता. त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरु होती. वडगाव पानच्या पुढे सकाळी दहाच्या सुमारास ‘लोकमत’ प्रतिनिधींनी हा टॅँकर थांबवित टॅँकर चालकाकडे टॅँकर गळतीबाबत विचारणा केली असता त्याने मोघम उत्तरे दिली. त्याच्याकडे लॉगबुकची मागणी केली असता सहीसाठी ते दिल्याचे त्याने सांगितले. या पाणी गळतीचे चित्रीकरण ‘लोकमत’कडे उपलब्ध आहे. दरम्यान, पाणीगळतीबाबत सादतपूर ग्रामस्थांकडे विचारणा केली असता पाण्याचा टँकर येतो आणि लगेचच रिकामा होत असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.‘लोकमत’ने यापूर्वीच टँकरचे स्टिंग आॅपरेशन करुन त्रुटी निदर्शनास आणल्या होत्या. मात्र, त्यानंतरही ठेकेदारांचा मनमानीपणा सुरुच आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही याकडे दुर्लक्ष करत आहेत.टँकर ठेकेदारांवर कारवाई करु नका यासाठी जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर दबाव असल्याची चर्चा आहे. राजकीय नेतेच टँकरचे ठेकेदार असल्याने जिल्ह्यातील आमदार, खासदार याबाबत मौन पाळून आहेत. सेना-भाजपचे पदाधिकारीच टँकर पुरवठ्यात सहभागी आहेत. त्यामुळे प्रशासन सर्व अनियमिततेकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा आहे. पालकमंत्री राम शिंदे यांनी टँकरबाबत तपासणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही सुधारणा झालेली नाही.संबंधित टँकर मधल्या काळात बंद करण्यात आला होता. कारण पाणी वाटपात दुजाभाव होत होता. काहींना फक्त हंडाभर तर काहींना टाकीभर पाण्याचे वाटप होत होते. गळती संदर्भात ठेकेदाराला अनेकदा कल्पना दिली होती. मात्र, त्यात सुधारणा झाली नसल्याचे दिसते. -बबनराव काळे, माजी सरपंच, सादतपूर, ता.संगमनेर.या टँकर चालकाकडील लाँग बुक हे त्याने सह्यांकरिता मंगळवारी कार्यालयात जमा केले होते. त्यामुळे ते त्याच्याकडे नसावे. सादतपूर गावाला सुरळीत पाणी पुरवठा होत असून टँकरचे पाणी हे साठवण विहिरीत टाकून नंतर पंपाच्या सह्याने उचलले जाते. तर गावच्या परिसरात असलेल्या वाड्यावस्त्यांवर ठिकठिकाणी प्लास्टिकच्या टाक्या भरल्या जातात. -एस.बी.शिरसाठ, ग्रामसेवक, सादतपूर, ता.संगमनेर

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर