कर्जत : कृषी विभागाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कांदा चाळीसाठी आॅनलाइन अर्ज मागवले होते. कांदा चाळीसाठी अनुदान मिळावे, म्हणून कर्जत तालुक्यातील तब्बल ४५५९ शेतक-यांनी आनलाइन अर्ज केले होते. यातून लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी कृषी अधिका-यांनी तब्बल सलग चौदा तास परिश्रम घेतले. त्यानंतर १२२ लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली.कर्जत तालुक्यातील ४५५९ शेतक-यांनी कांदा चाळ अनुदानासाठी आॅनलाइन अर्ज दाखल केले होते. मंगळवारी कृषी विभागाच्या वतीने लाभार्थ्यांची यादी तयार करण्यासाठी कर्जत येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात सोडत काढण्यात आली. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते चिठ्ठी काढून कांदा चाळीसाठी अनुदानास पात्र ठरणा-या शेतक-यांची यादी तयार करण्यात आली. ही यादी तयार करण्यासाठी कृषी अधिकारी व प्रशासनाने तब्बल चौदा तास अथक परिश्रम घेतले. चौदा तासाच्या अथक परिश्रमानंतर कर्जत तालुक्यातील १२२ शेतक-यांची कांदा चाळ अनुदानासाठी यादी तयार करण्यात आली. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी राजाराम गायकवाड, कर्जत तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, कर्मचारी विश्वास तोरडमल, संतोष सुरवसे, रामदास राऊत, अनिल तोडकर, संदीप पवार, विकास तोरडमल, आश्रु घालमे, रामदास सुपेकर, सुरेश जायभाय, किसन तांदळे, संजय गोडसे, मधुकर पाबळे, भरत गाढवे, बापु होले, कैलास महानगर यांच्यासह कृषी विभागाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
सलग चौदा तासाच्या परिश्रमानंतर १२२ कांदा चाळीच्या लाभार्थ्यांची यादी तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 3:51 PM