श्रीगोंदा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा अडविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने इशारा दिल्यानंतर तातडीने बंद केलेले आवर्तन गुरुवारी पुन्हा सोडण्यात आले. कुकडीचे आवर्तन २९ जुलैला सोडण्यात आले होते. कर्जत, करमाळा तालुक्यात पाणी गेले. पण श्रीगोंदा तालुक्यास पाणी मिळण्यास विलंब झाला. दरम्यानच्या काळात पाऊस झाला नाही. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला विशेष झळ बसली. श्रीगोंदा तालुक्याचे आवर्तन चालू असताना कुकडीचे उपविभागीय कार्यालय अळकुटीला हलविण्यात येणार हे जाहीर झाले. परंतु जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी कुकडीचे तीन धरणे जुन्नर तालुक्यात आहेत. त्यामुळे उपविभागीय कार्यालय नगर जिल्ह्यात नेणे हा अन्याय आहे. आपण या मुद्यावर कुकडीचे पाणी नगर जिल्ह्यात जाऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. यावर पिंपळगाव जोगे, येडगाव, माणिकडोह धरणातून चालू असलेले आवर्तन बंद केले होते. याचे पडसाद श्रीगोंदा, पारनेर, कर्जत तालुक्यातील कुकडीचे लाभक्षेत्रात उमटले. त्यावर राष्टÑवादीने हा इशारा दिला होता. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौºयाला गालबोट लागू नये म्हणून जलसंपदा विभागातील प्रशांत कडुसकर यांनी आमदार सोनवणे यांची मनधरणी करुन गुरुवारी दुपारी कुकडीचे आवर्तन पुन्हा सोडले.
राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर कुकडीचे आवर्तन पुन्हा सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 3:06 PM