अहमदनगर/जामखेड : जामखेड तालुक्यातील आघी येथे सीना नदीपात्रातील वाळूठेक्यामध्ये नियमानुसार उत्खनन होत नाही. तसेच येथे करारनाम्यातील अटी व शर्तींचे उल्लंघन होत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाने येथील वाळूउपसा तात्पुरता बंद केला आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथेही ग्रामस्थांनी ठेका बंद पाडल्यानंतर प्रशासनाने तेथील वाळूउपसा थांबवला होता.जिल्ह्यातील अवैध वाळूउपसाचे अनेक पुरावे ‘लोकमत’ने उजेडात आणले आहेत. आघी येथील वाळूउपशाबाबतही दिघी येथील ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते. या आंदोलनाची दखल घेत अपर जिल्हाधिकाऱ्यांनी या ठेक्याला तात्पुरती स्थगिती दिली आहे. नियमानुसार उत्खनन झाले आहे का? तसेच किती उपसा झाला याबाबत तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी तपासणी करुन अहवाल पाठवावा असे आदेशात म्हटले आहे.या प्रकरणात पोलिसांनी आंदोलन करणाºया महिलांवर गुन्हे दाखल केले होते. जामखेड तालुक्यातील आघी व कर्जत तालुक्यातील दिघी ही दोन्ही गावे सीना नदीपात्राच्या बाजूलाआहेत.माजी पाटबंधारे मंत्री आबासाहेब निंबाळकर हे दिघी गावचे रहिवासी होते. ते हयात असताना त्यांनी येथील वाळूउपसा होऊ दिला नाही. त्यांचे सुपुत्र राजेंद्र निंबाळकर यांनीही सीना नदीपात्रातील वाळूउपसा करू नये याबाबत आंदोलन केले. त्यामुळे त्यांना कर्जत येथील राजकीय शक्तीचा सामना करावा लागला. परंतु त्यांनी वाळूउपसा होऊ दिला नाही.वाळूउपसा न झाल्यामुळे पाणीसाठा वाढला तसेच दोन किलोमीटर अंतरावरील विहिरी, कूपनलिका यांना बारमाही पाणी असल्याने दुष्काळात सुद्धा टँकरची गरज भासली नव्हती.त्यामुळेच आपल्या शेतीच्या भवितव्यासाठी येथील ग्रामस्थ वाळूउपशाला विरोध करीतआहेत.आंदोलकांवरच गुन्हे दाखल करण्याचा प्रतापवाळूउपशाला विरोध करणाºया या आंदोलनात सरपंच देविदास महानगर, औदुंबर निंबाळकर, रोहित निंबाळकर, सोमनाथ महारनवर, महेश निंबाळकर, योगेश देवकर, प्रवीण इंगळे, मनोज देवकर, हिम्मत निंबाळकर, सुधीर भोईटे, नानासाहेब गोयकर, दत्तात्रय इंगळे आदी ग्रामस्थांसह महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. परंतु पोलिसांनी २२ महिला आंदोलकांवरच गुन्हे दाखल करण्याचा प्रताप केला. त्यामुळे पोलिसांच्या हेतूबाबतच संशय निर्माण होत आहे.राहुरी, कोपरगावचे ठेके अडचणीतकोपरगाव येथील मायगावदेवी येथील वाळू उत्खननाबाबतही ‘लोकमत’ने बातम्या प्रकाशित केल्या आहेत. या ठेक्याचीही प्रशासनाने तपासणी केली असून काही अनियमितता आढळल्या असल्याचे पालवे यांनी सांगितले. राहुरी तालुक्यात बारागाव नांदूर येथे प्रशासनाला काही वाळूचा साठा सापडला होता. तसेच करजगाव व जातप येथील उपशाबाबत तक्रारी आहेत. तेथे तपासणी होणार का? याची प्रतीक्षा आहे.प्रशासन हादरलेवाळू उपशातील अनियमितता ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर अण्णा हजारे यांनी सरकारकडे तक्रार केली आहे. अण्णांनी ‘लोकमत’च्या बातम्यांची कात्रणेच सरकारला पाठवली आहेत. ‘लोकमत’च्या वार्तांकनामुळे औरंगाबाद खंडपीठ व नगर जिल्हा न्यायालयातही याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला हा मोठा हादरा मानला जात आहे.लोकमतला धन्यवाद‘लोकमत’ने जिल्ह्यातील वाळूतस्करीबाबत रोखठोक भूमिका घेतली आहे. त्यामुळेच कारवाया सुरु झाल्या आहेत. जनतेतही आता जागृती येत आहे. वाळू तस्करांना कायद्याचा बडगा दाखविल्यास त्यांची दहशतच संपून जाईल. ती संपतही चालली आहे. - टिळक भोस, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष
हनुमंतगावपाठोपाठ आघीचाही वाळू ठेका बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 1:22 PM
जामखेड तालुक्यातील आघी येथे सीना नदीपात्रातील वाळूठेक्यामध्ये नियमानुसार उत्खनन होत नाही. तसेच येथे करारनाम्यातील अटी व शर्तींचे उल्लंघन होत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाने येथील वाळूउपसा तात्पुरता बंद केला आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथेही ग्रामस्थांनी ठेका बंद पाडल्यानंतर प्रशासनाने तेथील वाळूउपसा थांबवला होता.
ठळक मुद्देदिघी ग्रामस्थांच्या लढ्याला यशअटी-शर्तींचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारीनंतर कारवाई, ‘लोकमत’च्या मोहिमेचे ग्रामस्थांकडून स्वागत