शेवगाव: एस.टी. कर्मचाºयांच्या संपास शेवगाव येथे जोरदार प्रतिसाद मिळाला. आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाºयांनी शांततेच्या मागार्ने आंदोलन केले़ आंदोलनकाळात शेवगाव आगाराच्या एकाही बसची तोडफोड झाली नाही. दोन दिवसात आगारातून एकही बस सुटली नाही. त्यामुळे वरिष्ठ आपल्यावर नाराज होतील या न्युनगंडाने पछाडलेल्या आगार प्रमुखांनी विविध संघटनांच्या ५ पदाधिकारी असलेल्या कर्मचाºयांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे़ निलंबित झालेल्या कर्मचाºयांचे मागे संघटना उभी आहे़ एस.टी.च्या अधिकाºयांनी ही कारवाई मागे घ्यावी अन्यथा जिल्हा व राज्य पातळीवर पुन्हा आंदोलन उभे करण्याचा इशारा महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स काँग्रेसचे (इंटक) जनरल सेक्रेटरी मुकेश तिगोटे यांनी दिला आहे.शेवगाव आगाराच्या प्रवेश द्वारावर रविवारी पार पडलेल्या आगारातील कर्मचाºयांच्या जाहीर सभेत तिगोटे बोलत होते. यावेळी विभागीय सचिव सुरेश चौधरी, मिडिया विभागाचे प्रमुख माया डोळस, विभागीय सचिव राजेंद्र घुगे, भाऊसाहेब लिंगे, दिलीप लबडे, संजय गीते, राजेंद्र वडते, राजेंद्र सरोदे, रावसाहेब पवार, लक्ष्मण लव्हाट, इस्माईल पठाण, रावसाहेब जाधव, एस.जी.शेख, एस.एम.शेख आदी उपस्थित होते़शेवगाव शहर व तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे तसेच संस्था संघटनांचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी निलंबनाची कारवाई झालेल्या आगारातील कर्मचाºयाचे निलंबन मागे घ्यावे यासाठी आगार प्रमुख व वरिष्ठ अधिकाºयांकडे मागणी केली आहे़ या बाबत दि.२० जून पर्यत सकारात्मक कार्यवाही झाली नाही. तर रास्ता रोको व त्यानंतर अधिक आक्रमक आंदोलन पुकारण्याचा निर्धार जाहीर केला आहे. संघटनेच्या पातळीवर सुद्धा कर्मचाºयांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी यावेळी सूचित केले. कर्मचाºयांचे संप आंदोलन मोडीत काढण्याचा व सूड भावनेतून कामगारात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न उधळून लावण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून कामगारांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. अत्यंत कमी पगारावर काम करणाºया मात्र प्रवाशांची सेवा चोख बजावून जनतेत आपले पणाची भावना निर्माण करणाºया एस.टी.कर्मचाºयांच्या विविध मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी तसेच वेतनवाढीचा तिढा सामोपचाराने सुटावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, तसेच शिवसेना प्रमुख यांनी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त करून याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय झाला नाही तर राज्य भरातील एस.टी.कर्मचाºयांना रस्त्यावर उतरण्या शिवाय पर्याय नसल्याचा निर्धार तिगोटे यांनी व्यक्त केला़यावेळी टायगर फोर्सचे राज्याचे प्रवक्ते प्रा.किसन चव्हाण, कॉ.संजय नांगरे, गोरक्षनाथ शेलार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सेक्रेटरी बाळासाहेब फटांगडे यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. दिलीप लबडे यांनी सूत्र संचालन केले.