केडगाव : नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत आज कांद्याचे भाव कोसळल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट शहर बाह्यवळणावर ठिय्या मांडत आंदोलन सुरु केले.
कांद्याला भाव वाढून मिळावेत यासाठी शेतकरी आक्रमक झाल्याने पोलीस प्रशासन दाखल झाले.सुमारे तीन तास चाललेल्या आंदोलनामुळे बाह्यवळण वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती.कांद्याने आर्थिक गणित कोलमडल्याने काही शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.