अहमदनगर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक दहशतवाद विरोधी कृती समितीच्या वतीने वाडियापार्क क्रीडा संकुल येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण आदरांजली वाहिली. यावेळी उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.
मोदी प्रणित भाजप सरकारच्या जातीयवादी धोरणामुळे देशातील दलित व अल्पसंख्यांक समुदायावर अत्याचार होत असल्याचा आरोप करीत उत्तर प्रदेशातील योगी सरकारचा निषेध नोंदवून सरकार बडतर्फ करुन, अत्याचार करणाºया नराधमांवर कठोर कारवाई करुन पिडीत तरुणीला न्याय देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी मोदी व योगी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी अॅड. कॉ.सुभाष लांडे, बहिरनाथ वाकळे, कॉ.महेबुब सय्यद, अशोक सब्बन, अॅड. सुधीर टोकेकर, अब्दुलरहीम शेख, अर्शद शेख, कॉ.अनंत लोखंडे, संध्या मेढे, भारती न्यालपेल्ली, आप्पासाहेब बंडेलू, तारीख शेख, कमर सुरुर, अंबादास दौंड, संदीप सकट, दत्ता वडवणे उपस्थित होते.
या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, लाल निशाण पक्ष, आयटक, सीटू, कामगार संघटना महासंघ, लाल बावटा विडी कामगार संघटना, क्रांतीसिंह कामगार संघटना, भारतीय महिला फेडरेशन, जनवादी महिला संघटना, ए.आय.एस.एफ., ए.आय.वाय.एफ., डी.वाय.एफ.आय., अ.भा. जातीविरोधी मंच, अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळ, रहेमत सुलतान फाऊंडेशन, पीस फाऊंडेशन, उर्जिता सोशल फाऊंडेशन, शब्दगंध, मागासवर्गीय, ओबीसी, अल्पसंख्यांक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघाचा सहभाग होता.