राहुरी : येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाव्दारे सोमवारी आॅनलाईन कांदा बियाणे विक्री सुरु झाली होती. सकाळी १० वाजेपासून ते दुपारी १ वाजेपर्यंत या तीन तासातच विद्यापीठाचे बियाणे विकले गेले. कांदा बियाणांसाठी शेतक-यांना मोठी धावपळ करावी लागली. अनेकांना पैसे भरुनही बियाणे मिळाले नाही. नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सोमवारी सकाळी दोन तास विद्यापीठाची आॅनलाईन साईट ओपन झाली नाही. त्यानंतर फार्म भरुन ३६ तासात एनएफटी अथवा आरटीजीएसने पैसे भरण्यास सांगितले. परंतु पैसे भरल्याशिवाय फार्म सबमीट होत नव्हते. त्यामुळे शेतकºयांना प्रथम पैसे भरायला सांगितले. त्यातही रोख रक्कम स्वीकारत नव्हते. काहींनी रोख रक्कम विद्यापीठाच्या खात्यात जमा केली.
विद्यापीठाने यानंतर ट्रांझिक्शन नंबर मागितला. त्यात स्टेट बँकेच्या चास (ता.नगर) येथील कर्मचा-यांनी शेतकºयांची अडवणूक केली. तांत्रिक मुद्दा उपस्थित करुन एकाच बँकेत आरटीजीएस अथवा एनएफटी होत नाही. यामुळे पैसे ट्रान्सफर होत नाही. परंतु जमा स्लीपवर ट्रांजिक्शन नंबर नसल्यामुळे अडचण आली. त्या दरम्यान अनेक शेतक-यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पैसे भरुन घेतले. फार्म सबमीट करायला गेले तर विद्यापीठातील सर्व बियाणे संपले आहेत,असे सांगितले. यामुळे अनेक शेतकºयांची निराशा झाली. आता शेतकºयांनी पैसे भरले, परंतु बियाणे मात्र मिळाले नाही.
आता या शेतक-यांना पैसे कधी मिळणार? असा सवाल शेतकºयांनी केला आहे. बियाणे इतक्या लवकर कसे काय विकले? याची चौकशी करावी, अशी मागणी शेतक-यांकडून होत आहे.
४२२० किलो कांदा बियाणे विक्री झाली. १० वाजता बियाणे विक्रीस सुरुवात केली. ते बियाणे एक तासात संपले. ज्या शेतक-यांनी आॅनलाईन पैसे भरले आहेत. त्यांना बियाणे भेटणार आहे. ज्यांनी आॅनलाईन प्रक्रिया व्यतिरिक्त पैसे भरले आहेत त्यांना बियाणे भेटणार नाही. -आनंद सोळंके, प्रमुख शास्त्रज्ञ, बियाणे विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.