राहुरी : कार्यालयात बसून योजना राबविल्या जाणार नाहीत. शेतक-यांच्या बांधावर जाऊन त्यांना रूचेल अशा योजना तयार करू. वेळेप्रसंगी बिनकामाच्या योजना बंद करून शेतक-यांच्या योजना राबविल्या जातील, असे मत कृषिमंत्री दादा भिसे यांनी व्यक्त केले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या नानासाहेब पवार सभागृहात शनिवारी आयोजित केलेल्या मागोवा-२०१९ या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षपदावरून भुसे बोलत होते. भुसे म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा केंद्रबिंदू शेतकरी असल्याने कृषी विभागासाठी निधी कमी पडणार नाही. शेतक-यांनी योजना राबवितांना सूचना केल्यास स्वागत केले जाईल. हवामानातील बदलामुळे शेती परवडत नाही. अशा परिस्थितीत शेतक-यांसाठी संशोधनाचा जास्तीत लाभ कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कसा होईल, यादृष्टीने शास्त्रज्ञांनी नियोजन करावे. बाळासाहेब थोरात म्हणाले, राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे शेतक-यांसाठी असलेले योगदान महत्वाचे आहे. विद्यापीठावर टीका होताना त्यावर उपाययोजना करून शेतक-यांचे समाधान केले पाहिजे. कपाशी, डाळिंब, बाजरी, ऊस या क्षेत्रात विद्यापीठाने मोठे काम केले.प्रास्तविकात कुलगुरू डॉक़े.पी.विश्वनाथा यांनी केले. भुसेंनी केला शेतक-यांचा सन्मान कृषि क्षेत्रात लसूण या पिकावर संशोधन करणारे शेतकरी विष्णू जरे यांना विचारपिठावर स्वत:च्या खुर्ची शेजारी बसण्याचा मान कृषिमंत्री भुसे यांनी दिला.
बिनकामाच्या योजना बंद करणार-कृषिमंत्री दादा भुसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 5:43 PM