- उमेश कुलकर्णीपाथर्डी (जि. अहिल्यानगर) - ‘पाथर्डीला या आणि पास होऊन जा’ अशा प्रकारची हमी ज्या बाहेरगावच्या मुला-मुलींना दिली होती, तो पाथर्डी पॅटर्न यंदा फेल ठरला आहे. पैसेही गेले, पदोन्नतीही गेली, वेळही गेला आणि हाती भोपळा आला परिस्थिती बाहेरगावच्या कॉपीबहाद्दरांवर ओढवली आहे.
‘लोकमत’च्या प्रतिनिधीने गुरुवारी पाथर्डी शहरातील परीक्षा केंद्रांची पाहणी केली. त्यावेळी कॉपीमुक्त अभियानाच्या कडक अंमलबजावणीमुळे परीक्षा केंद्र कॉपीमुक्त असल्याचे दिसून आले.
विद्यार्थ्यांचा डाव फसलाआठ-दहा वर्षांपासून ‘पाथर्डीत या आणि पास होऊन जा’ असा दंडकच बनला होता. त्यामुळे पुणे, मुंबई, मराठवाडा येथून विद्यार्थी येथे येतात. यंदाही बाहेरगावहून आलेले विद्यार्थी लॉज, खासगी रूममध्ये भाड्याने राहत आहेत. परंतु, प्रशासनाची करडी नजर असल्याने त्यांचा डाव यंदा फसला आहे.
अखेर पैसे, ॲडमिशन अन् परीक्षाही गेली वायागुरुवारी मराठीचा पेपर होता. नाव न सांगण्याच्या अटीवर परीक्षा देण्यासाठी पाथर्डीत आलेले बाहेरगावचे विद्यार्थी म्हणाले, आम्ही एजंटामार्फत इथे आलो आहोत. आम्हाला प्रमोशन पाहिजे होते. त्यासाठी आम्ही हा उद्योग केला. मात्र, इथे प्रशासनाने परीक्षा कडक केली आहे. त्यामुळे आमचे पैसे गेले, प्रमोशन गेले, वेळ गेला व हाती भोपळा आला. परीक्षेच्या काळात स्वत:ला दादा म्हणविणारे अनेकजण गायब झाले आहेत. पोलिसांनीही परीक्षा केंद्राबाहेर चोख बंदोबस्त ठेवला आहे.
‘बारावी पास’ पॅटर्नची लाखोंची उलाढालविद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची हमी काही एजंट घेत असून यात लाखो रुपयांचे अर्थकारण दडले आहे. मुुलांचा प्रवेश ते त्यास उत्तीर्ण करणे या कामासाठी २५ हजार रुपयांहून अधिक शुल्क आकारले जात असल्याचे समजते.