रियाज सय्यदकोपरगाव : वस्त्र हा मनुष्याचा अविभाज्य घटक आहे. मग ते स्वदेशी असेल तर त्याचा निश्चित अभिमान असतो. अशा प्रकारे कोपरगावातील चार महिलांनी तब्बल ३४ गोरगरीब, गरजवंत व होतकरू महिलांच्या हाताला वस्त्र निर्मितीचे काम देऊन चार चौघींचा नवा आदर्श समाजासमोर उभा केला आहे.जैन दिगंबर समाजाचे आचार्य विद्यासागर महाराज यांनी दहा वर्षे मानवी गरजांचा अभ्यास करून महाराष्टÑात २०-२२ ठिकाणी काम सुरू केले. त्यांची प्रेरणा घेऊन कल्याणी गंगवाल, अरूणा लोहाडे, शोभना ठोळे व पूजा पापडीवाल या चार महिलांनी एकत्र येत दोन वर्षांपूर्वी शहरात अहिंसा वस्त्र उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. दोऱ्याची खरेदी, कापड निर्मिती व विक्री या महिलाच करतात. लक्ष्मीनगरमध्ये मालेगावहून आणलेल्या दोन हातमागावर आधी स्वत: प्रशिक्षण घेतले. नंतर ज्यांच्या हाताला काम नाही, अशा महिला शोधून त्यांना प्रशिक्षकामार्फत हातमाग यंत्र चालविण्यास शिकविले. विजेशिवाय हातमाग यंत्र चालतात. दिवसभर हात व पायाच्या सहाय्याने हातमागावर तयार होणाºया कापडाला मीटरप्रमाणे मानधन दिले जाते. त्यातून कामगार महिलांना ३००-४०० रूपये रोज पडतो. घरकाम करून या महिला कापड तयार करण्याचे काम करतात. या महिलांना सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखीचा त्रास होत नाही. दोन पाळ्यांमध्ये एकूण १५ यंत्रांवर तब्बल ३४ महिला कार्यरत आहेत. सुती दोºयापासून टॉवेल, बेडशीट, उश्या, शर्टाचे कापड, धोतर, साडी, हातरूमाल, स्कार्प, पिशव्या आदी विविध वस्तू तयार केल्या जातात. तयार वस्तूंचे विक्री केंद्र देखील त्याच चालवितात. खादीचे कापड हे स्वदेशी असून शरिराला पूरक असल्याने कुठलीही हानी पोहचत नाही. सत्कारासाठी फुलांऐवजी पर्यावरण रक्षणार्थ कापडी हात रूमालाचे बुके दिले जातात. त्यामुळे महिलांच्या या ‘अहिंसा’ वस्त्र उद्योगाने समाजात वेगळा आदर्श निर्माण केला आहे.खादीच्या स्वदेशी कापड निर्मिती बरोबरच पर्यावरण पूरक मातीची भांडी, माठ, रांजण, बाटल्या, जग, कुकर, ग्लास देखील तयार केले जातात. बांबूपासून शिरई, टोपली, सूप, फुलदाणी आदींची निर्मिती सुरू आहे. २०२० सालापर्यंत हस्तकला काम करणाºया किमान २०० महिला प्रशिक्षित करण्याचे करण्याचे उद्दिष्ट आहे.आई-वडील, दोन बहिणी व एक भाऊ असे आमचे कुटुंब आहे. मी बहिणींमध्ये लहान आहे. माझे शिक्षण बारावीपर्यंत झालेले आहे. गेल्या दीड वर्षांपासून मी हातमाग यंत्रावर साडी तयार करण्याचे काम करते. त्यातून चांगला रोजगार मिळतो. कुटुंबाच्या उदरनिर्वाहात त्याची भर पडते. हातमाग यंत्रावरील कामाचे समाधान आहे.-प्रियंका सुपेकर, कामगार.
चौघींचा हातमागावर ‘अहिंसा’ वस्त्र उद्योग : ३४ गरीब महिलांना रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 11:28 AM