शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
2
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
3
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
4
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
5
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
6
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
7
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
8
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
9
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
10
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
11
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
12
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
13
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
14
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
16
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
17
शायना एनसींना इम्पोर्टेड माल म्हटल्याबद्दल अरविंद सावतांनी मागितली माफी; म्हणाले, "जाणूनबुजून मला..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सांगलीत महायुतीला मोठा दिलासा! सम्राट महाडिकांचा यू-टर्न, अपक्ष अर्ज माघार घेणार; सत्यजीत देशमुखांचा प्रचार करणार
19
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग
20
Bad Luck! कोहलीच्या बॅटनं खेळण्याची हुक्की; Akash Deep वर ओढावली Diamond Duck ची नामुष्की!

अहमदनगर, शिर्डीची मोजणी १६८ टेबलवर : लोकसभेचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 11:33 AM

नगर व शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी २३ मे रोजी होणार असून याची तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे.

अहमदनगर : नगर व शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी २३ मे रोजी होणार असून याची तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे. यासाठी सुमारे दीड हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. सकाळी आठ पासून मोजणीस प्रारंभ होणार असून दुपारपर्यंत ईव्हीएमची मतमोजणी पूर्ण होऊन चित्र स्पष्ट होईल, मात्र त्यानंतर काही व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या व टपाली मतदान मोजण्यास वेळ लागणार असल्याने अधिकृत निकाल सायंकाळी सात वाजेपर्यंत जाहीर होऊ शकतो.जिल्हा प्रशासनाने नगर व शिर्डी अशा दोन्ही मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. एमआयडीसीतील राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ही मतमोजणी होणार आहे. त्यासाठी सुमारे दीड हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताफा सज्ज झाला असून दोन टप्प्यात या कर्मचाºयांना मतमोजणीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यातील पहिले प्रशिक्षण १४ मे रोजी होणार आहे. त्यानंतर २२ मे रोजी मतमोजणीची रंगीत तालीमच गोडाऊनमध्ये होणार आहे. नगर मतदारसंघात २०३० मतदान केंद्रांवर ६४.२६ टक्के, तर शिर्डीत १७१० मतदान केंद्रावर ६४.५४ टक्के मतदान झालेले आहे.प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एका कक्षाची उभारणी करण्यात आली असून, त्यात प्रत्येकी १४ टेबल असतील. त्यानुसार साधारण २२ ते २५ फेºयांत मोजणी होणार आहे.एका फेरीसाठी १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागणार असून, प्रत्येक फेरीनिहाय उमेदवारांना पडलेली मते जाहीर होतील. साधारण दुपारी एक वाजेपर्यंत फेºया संपून निकालाचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर टपाली व काही व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजणीस वेळ लागणार असल्याने सायंकाळी सातपर्यंत अंतिम निकाल हाती येऊ शकतो.जिल्ह्यात ६० व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मोजणारप्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ५ मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मोजल्या जाणार आहेत. जिल्ह्यात १२ विधानसभा मतदारसंघ असल्याने ६० व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मोजल्या जातील. याशिवाय नगर मतदारसंघातून १३ हजार १७८ टपाली व ७ हजार १४८ ईटीपीबीएस (आॅनलाईन मतपत्रिका) मतपत्रिका पाठविल्या होत्या. त्यातील ४ हजार ९७९ टपाली, तर ३ हजार ७९४ ईटीपीबीएस मतपत्रिका प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. शिर्डी मतदारसंघातूनही ८ हजार ८७० टपाली व २ हजार ७७६ ईटीपीबीएस मतपत्रिका पाठवल्या आहेत. या मतपत्रिका व व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मोजणीसाठी मोठा कालावधी लागू शकतो. परिणामी निकाल लांबणार आहे.मतमोजणी स्टाफ (नगर मतदारसंघ)मतमोजणी कक्ष - ६मतमोजणी टेबल - ८४टपाली मोजणी टेबल - १मतमोजणी पर्यवेक्षक - ८४मतमोजणी सहायक - ८४सूक्ष्म निरीक्षक - ८४आकडेवारी एकत्रिकरण स्टाफ - १२रो आॅफिसर - ६शिपाई - १२०सिलिंग स्टाफ - ३६माध्यम समन्वयक - १उपजिल्हाधिकारी - १अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी - ८राखीव अधिकारी-कर्मचारी १६१सीपीएफ स्टाफ - २६एसआरपीएफ - २६स्टेट पोलीस स्टाफ- १९

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय