अहमदनगर : अकोले तालुक्यातील आढळा धरणाच्या भिंती मधून पाण्याची गळती वाढली आहे. धरणाच्या पाणी सोडण्याच्या दरवाजा शेजारी दगडी बांधकामातून अनेक ठिकाणी पाण्याची चिंताजनक गळती सुरू आहे. अनेक वर्षांपासूनच्या पाझराचे रुपांतर आता लहानशा धबधब्यामध्ये झाल्याचे दिसून येते.
ठिकठिकाणच्या अनेक छिद्रांमधून एकत्रितपणे सुमारे एक क्युसेक वेगाने पाण्याची गळती होत असावी. एक हजार ६० दशलक्ष घनफूट क्षमतेचे धरण भरल्यापासून सातत्याने पाण्याची गळती व भिंतीच्या बांधकामाची झीज होत आहे. मात्र, या ठिकाणी जलसंपदा विभागाने अद्यापही देखभालीसाठी प्रयत्न केले नाहीत.