अहमदनगर - डेहराडून येथे खालसा प्रॉडक्शन हरिद्वार वतीने आयोजित केलेल्या ‘मिस इंडिया फेस आॅफ बॉलीवूड-२०१८’ या राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत नगरच्या संयुक्ता शेकटकर हीने प्रथम पारितोषिक पटकाविले. या राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेबरोबरच कु.संयुक्ता हीने ‘मिस महाराष्ट्र फेस आॅफ बॉलीवूड’ ‘मिस टॅलेंटेड-२०१८’ व ‘मिस ब्युटीफुल आईज -२०१८’ या स्पर्धेत प्रथम पुरस्कार पटकावले. सर्व स्पर्धकांमध्ये वयाने सर्वात लहान असणा-या संयुक्ताने अंतिम फेरीत देशभरातील ३० स्पर्धकांना मागे टाकत राष्ट्रीय पारितोषिके पटकावली. परिक्षण एमटीव्ही स्कूल फिचर्सचे प्रणव बबर व आंतरराष्ट्रीय मॉडेल विशाल चौधरी यांनी केले.नगरच्या रचना कला महाविद्यालयाचे संस्थापक व प्रख्यात चित्रकार दिवगंत अर्जुनराव शेकटकर यांची संयुक्ता ही नात असून, रचना कला महाविद्यालयाचे संचालक प्रशांत शेकटकर व वर्षा शेकटकर यांची कन्या आहे. संयुक्ताला लहानपणापासून नृत्य व अभिनयाची आवड आहे. डेहराडून येथे झालेल्या या सौंदर्य स्पधेर्तील सर्व विभागात विशेष कामगिरी करत प्रथम क्रमांकाची पारितोषिके पटकाविली आहे. खालसा प्रॉडक्शन हरिद्वारच्यावतीने भविष्यात विविध मालिका व चित्रपटांमध्ये काम करण्याची संयुक्ताला मिळणार आहे.
अहमदनगरची संयुक्ता शेकटकर ठरली ‘मिस इंडिया फेस आॅफ बॉलिवूड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 4:16 PM
डेहराडून येथे खालसा प्रॉडक्शन हरिद्वार वतीने आयोजित केलेल्या ‘मिस इंडिया फेस आॅफ बॉलीवूड-२०१८’ या राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत नगरच्या संयुक्ता शेकटकर हीने प्रथम पारितोषिक पटकाविले.
ठळक मुद्देसौंदर्य स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे तीन पुरस्काराची मानकरी