अहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारा अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमला आज एक दिवसाची शहरबंदी करण्यात आली आहे. श्रीपाद छिंदमसह एकूण 70 जणांना शहरात एक दिवस बंदीची नोटीस बजावण्यात आली आहे. 16 फेब्रुवारी 2018 रोजी छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. श्रीपाद छिंदमने पीडब्ल्यूडीच्या एक कर्मचाऱ्यासोबत फोनवर संपर्क साधताना शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरले. याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यानंतर छिंदमवर सर्व स्तरातून सडकून टीका करण्यात आली. याप्रकरणी छिंदमला हद्दपार करण्यात आले.
अनेक ठिकाणी छिंदमविरोधात आंदोलनंदेखील करण्यात आली. त्यानंतर भाजपाने छिंदमची पक्षातून हकालपट्टी करत त्याच्याकडून उपमहापौरपदाचाही राजीनामाही घेतला होता.