- रोहित टेके
अहमदनगर - नगर-मनमाड महामार्गावर गतिरोधक नसल्याने शहरातील साईबाबा कॉर्नर आणि येवला नाका वाहने अतिशय वेगाने चालत आहे. त्यातून अपघात होत आहेत. त्यामुळे येथे गतिरोधक टाकून मिळावे यासाठी कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलनाचा इशारा प्रशासनाला निवेनाद्वारे देण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी(दि.३)सकाळी ११ वाजता रिक्षा व टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने साईबाबा कॉर्नर येथे जमलेले असताना आणि राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या आंदोलकांना आंदोलन न करण्याची विनंती करून दोन दिवसात गतिरोधक टाकण्याचे आश्वासन दिले होते. याचवेळी आंदोलकांसमोर साईबाबा कॉर्नर येथे एका कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी स्वार वृद्ध त्या ठिकाणी खाली पडून जखमी झाले आहे. जख्मी वृद्धला रिक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. कार चालक मात्र घटनास्थळावरून फरार झाला असून जखमी वृद्धाचे नेमके नाव समजू शकले नाही.